spot_img
spot_img

मेळघाटात ‘रामसेतू’ला हिरवा कंदील! केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या पाठपुराव्याला मोठं यश; वारी-सलवान जोडणारा भव्य पादचारी पूल मार्गी

संग्रामपूर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील वारी हनुमान ते सलवान दरम्यान प्रस्तावित ‘राम सेतू’ केबल-स्टेड पादचारी पुलासाठी वन विभागाने अखेर मंजुरी दिल्याने मोठा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

वारी हनुमान ते सलवान हा परिसर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येत असल्याने वन विभागाची परवानगी ही सर्वात मोठी अडचण होती. मात्र, या अडथळ्यावर मात करत वन मंत्रालयाकडून अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची डिझाईन तयार करून निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. सुमारे 7 कोटी 46 लाख रुपयांच्या खर्चातून हा भव्य केबल-स्टेड एफओबी पादचारी पूल उभारला जाणार आहे. पुलाची उंची तब्बल 45.80 मीटर असणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तो उभारला जाईल.

या पुलामुळे वारी ते सलवान दरम्यानची वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. विशेषतः पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना मोठ

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!