spot_img
spot_img

EXCLUSIVE पुण्याच्या ‘डॉन’चा मोठा घोटाळा उघड; जळगाव जामोदच्या डॉ.’केला’ला 26 कोटींचा फटका!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील आर्थिक गुन्ह्यांमध्ये मोठी खळबळ उडवणारा 26 कोटी रुपयांचा फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगाव जामोद येथील चाणक्य नितीत वावरणारे डॉ. किशोर किसनलाल केला (वय 65) यांची विश्वासघातकी पद्धतीने तब्बल 26 कोटींची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप पुण्यातील कन्हैयालाल देविचंद छोरीया आणि त्याचा मुलगा अनमोल छोरीया यांच्यावर करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपींनी सुरुवातीला मोठ्या प्रॉपर्टी प्रोजेक्ट्सचे गोड स्वप्न दाखवत डॉक्टरांचा विश्वास संपादन केला. मोठा प्लॉटिंग प्रकल्प उभा करून कोट्यवधींचा नफा मिळवून देतो असे आश्वासन देत त्यांनी डॉक्टरांना भागीदारीत ओढले. यासाठी आरोपी वारंवार त्यांच्या घरी भेट देत, मोठ्या उद्योग-व्यवसायाच्या गप्पा मारत प्रभाव निर्माण करत होते.

यानंतर आरोपींनी पुण्यातील भव्य कार्यालय, शेकडो कर्मचारी, सीए आणि नामांकित वकील असल्याचे सांगत सर्व कायदेशीर जबाबदारी स्वतःकडे घेतली. डॉक्टरांकडून कोट्यवधींची गुंतवणूक करून घेतल्यानंतर, नंदुरबार व मलकापूर प्रकल्पांतून 12 कोटींपेक्षा अधिक रक्कम उभी करण्यात आली. मात्र, या व्यवहाराचा एकही हिशोब न देता आरोपींनी संपूर्ण रक्कम स्वतःसाठी हडप केल्याचा आरोप आहे.

इतक्यावरच न थांबता, आरोपींनी डॉक्टरांची जमीन 25 कोटींच्या कर्जासाठी तारण ठेवून त्यांना जामीनदार बनवले. तसेच प्रकल्पातील प्लॉट विक्रीतून मिळालेली मोठी रक्कम स्वतःच्या कर्जफेडीसाठी वापरली. डॉक्टरांनी हक्काची रक्कम मागितल्यावर आरोपींनी तब्बल 25.92 कोटींचे धनादेश दिले, मात्र खात्यात पैसे नसल्याने ते बाऊन्स झाले. नंतर बँकेतून ‘स्टॉप पेमेंट’ करून आरोपींनी आपली गुन्हेगारी उघड केली.

धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींच्या कार्यालयातून डॉक्टरांना “छोरीया पिता-पुत्र पुण्याचे डॉन आहेत” अशी उघड धमकी देण्यात आली. यामुळे डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!