spot_img
spot_img

अत्यंत दुःखद : बुलढाण्याचे ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. डी. डी. कोथळकर यांचे निधन

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील ख्यातनाम व सेवाभावी बालरोगतज्ज्ञ डॉ. डी. डी. कोथळकर यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. कालच त्यांनी आपल्या एमबीबीएस बॅचच्या गेट-टुगेदरला उपस्थिती लावली होती. रात्री घरी परतल्यानंतर आज सकाळी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी उठले नाहीत. मुलगा डॉ. अमोल यांनी पाहणी केली असता ते झोपेतच निवर्तल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. मृदू स्वभाव, माणुसकीची जपणूक आणि समर्पित वैद्यकीय सेवेमुळे परिचित असलेल्या डॉ. कोथळकर यांच्या निधनाने बुलढाण्यात वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!