spot_img
spot_img

जिल्हा रुग्णालयात दारूच्या बाटल्यांचा खच; आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार उघड! मुख्यालयातील रुग्णालयाचीच दयनीय अवस्था; ग्रामीण भागाचे काय?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) केंद्रीय आरोग्य, आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या गृह जिल्ह्यातच आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयुष विभागाबाहेर विदेशी दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः खच आढळून आला. त्यामुळे हे रुग्णालय आहे की दारुड्यांचा अड्डा? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

गोरगरीब रुग्ण, महिला व वृद्ध मोठ्या विश्वासाने उपचारासाठी येतात; मात्र रुग्णालय परिसरातच दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत असल्याने असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. प्रशासनाचे या प्रकाराकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून, रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जिल्हा मुख्यालयातील रुग्णालयाची ही अवस्था असेल, तर ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांची स्थिती काय असेल? असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधितांवर तात्काळ कारवाई करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!