चिखली (हॅलो बुलडाणा/) तालुक्यातील रानअंत्री परिसरात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर शेषराव सुरडकर (रा. डोंगर खंडाळा) याने पीडितेला घरी एकटी असताना धमकावून शारीरिक संबंध ठेवले.हा प्रकार काही महिन्यांपासून सुरू असल्याची प्राथमिक माहिती असून, अल्पवयीन मुलीला पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीत गर्भधारणा झाल्याचे उघड झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला तात्काळ अटक केले असून पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे व रोहिदास पंढरे हे करीत आहे










