spot_img
spot_img

क्षयरोगाविरुद्ध आमदार खरातांचा दमदार पुढाकार; १०३ रुग्णांना ‘निक्षय मित्र’ म्हणून आधार!

मेहकर (हॅलो बुलडाणा) क्षयरोग निर्मूलनासाठी सामाजिक सहभागाची गरज अधोरेखित करत मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढाकार घेत १०३ क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे. संसर्गजन्य आजारांमध्ये क्षयरोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून, उपचारासोबत पोषण आहार मिळाल्यास रुग्ण बरे होण्याचा वेग वाढतो, हे लक्षात घेऊन त्यांनी ही जबाबदारी उचलली.

केंद्र शासनाच्या निक्षय योजनेअंतर्गत प्रौढ रुग्णांना गहू, डाळ, गोडेतेल व दुध पावडर तर बाल रुग्णांसाठी विशेष पोषण साहित्य देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत तब्बल १६८२ क्षयरुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी मेहकर मतदारसंघातील १०३ रुग्णांना आता नियमित पोषण आहार मिळणार आहे.

या उपक्रमामुळे रुग्णांना केवळ आरोग्य सहाय्यच नव्हे तर सामाजिक आधारही मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. कार्यक्रमावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय बलकार यांनी आमदार खरात यांचा ‘मी निक्षय मित्र’ फ्रेम देऊन सत्कार केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!