spot_img
spot_img

💥EXCLUSIVE बोगस दिव्यांगांना संरक्षण? खऱ्या अपंगांवर अन्याय! जिल्ह्यात UDID तपासणीचा ढोंगी खेळ उघड; हॅलो बुलढाणा उघडकीस आणले खऱ्या आणि बोगस दिव्यांगांचे फरक!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात शिक्षक व कर्मचारी यांच्या UDID कार्ड तपासणीचा दिखाऊ फार्स सध्या सुरू असून, या प्रक्रियेमुळे खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. आतापर्यंत केवळ चार तालुक्यांमध्येच तपासणी पूर्ण झाली असून, पुढील आठवड्यापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात तपासणी पूर्ण करण्याचे आदेश आहेत. ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही, त्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.मात्र,खरी लढाई आता सुरू होणार आहे ती प्रत्यक्ष अपंगत्व तपासणीची

खऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे की ही प्रत्यक्ष तपासणी जे.जे.रुग्णालय, मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलकडूनच व्हावी. कारण जिल्हा व तालुका पातळीवरील तपासणीत बोगस दिव्यांगांना वाचवले जाते, हा आरोप उघडपणे होत आहे. नाशिक, बीड आणि इतर जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीने मुंबई येथे प्रत्यक्ष तपासणी घेऊन बोगस दिव्यांग उघडे पाडले गेले, तशीच कारवाई बुलढाण्यात का नाही? हा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, फक्त बुलढाणा तालुक्यात शिक्षक व कर्मचाऱ्यांना ओरिजिनल UDID कार्डसह प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले, तर उर्वरित तालुक्यांमध्ये केवळ झेरॉक्स कागदांवरच समाधान मानण्यात आले. हा दुजाभाव नाही तर काय? यामागे जिल्हा परिषद विभागातून बोगस दिव्यांगांना ‘गोप्य पाठींबा’ दिला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रत्यक्ष तपासणी मुंबईत झाली तर जिल्हा परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रधारकांचा धक्कादायक आकडा समोर येईल, हे नक्की!

या संपूर्ण प्रकरणाला ‘हॅलो बुलढाणा’ने वाचा फोडली असून, त्यामुळेच प्रशासन हलले आहे. जिल्ह्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिव्यांग कल्याण विभागाचे कर्तव्यदक्ष सचिव तुकाराम मुंडे यांच्याकडून ठोस, निर्भीड आणि न्याय्य कारवाईची अपेक्षा आहे.आज एकच प्रश्न आहे बोगसांना संरक्षण की खऱ्यांना न्याय? हॅलो बुलढाणा खऱ्या दिव्यांगांच्या न्यायासाठी पाठीशी ठामपणे उभे आहे

क्रमशः

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!