spot_img
spot_img

शिवशंभू आखाडा रोहिणखेडचे राज्यस्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश

पवनी (हॅलो बुलडाणा) येथे दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय अस्टेडू आखाडा शिवकालीन मर्दानी खेळ स्पर्धेत रोहिणखेड येथील शिवशंभू आखाड्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत शिवशंभू आखाड्याच्या विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण, दोन रौप्य व पाच कास्य पदकांची कमाई करत आखाड्याचा तसेच गावाचा नावलौकिक वाढवला आहे.

या स्पर्धेत रेणुका विजय गुजर हिने U-19, 35 ते 40 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. विशाल गंगाराम सोळंके (U-14, 30 ते 35 किलो) व यश सुभाष इंगळे (U-17, 51 ते 55 किलो) यांनी रौप्यपदक मिळवले. गणेश संदीप भुसारी, वेदिका देविदास सपकाळ, प्रगती शांताराम राजस, वेदांती प्रकाश गलबले व आदिती प्रकाश गलबले यांनी कास्यपदक मिळवत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.

सन 2023 मध्ये संभाजी शिवाजी हाडे यांनी स्थापन केलेल्या शिवशंभू आखाड्यातून शिवकालीन मर्दानी खेळांचा प्रसार व संस्कार घडवण्याचे कार्य सुरू आहे. “बल हेच जीवन” या ध्येयमंत्रानुसार खेळाडूंची शारीरिक, मानसिक व चारित्र्य घडण घडवली जात आहे. या यशाबद्दल खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!