spot_img
spot_img

डोंगरखंडाळा येथील उद्योजक आसिफ भाई कलाल यांचे दुःखद निधन

डोंगरखंडाळा (हॅलो बुलडाणा) येथील सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले आसिफ भाई कलाल यांचे दिनांक 21 ला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने डोंगरखंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचे वय अंदाजे ५० ते ५५ वर्षे होते.

आसिफ भाई कलाल हे अतिशय मनमिळाऊ, हसमुख आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. बुलढाणा अर्बन परिवाराशी ते निकट संबंध ठेवून होते. सामाजिक, व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यात ते नेहमीच मदतीसाठी पुढे असत. कोणाच्याही सुखदुःखात धावून जाणे, अडचणीत असलेल्यांना आधार देणे हा त्यांचा स्वभाव होता.

गेल्या चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची अँजिओप्लास्टी (एनजीओ प्लास्टिक) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली होती. आजच त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. घरी परतल्यानंतर अचानक त्यांना घबराट जाणवू लागली आणि त्यांना लगेच बुलढाण्यात उपचाराकरिता नेत असतानाच काही वेळातच हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले.

त्यांच्या निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार, व्यावसायिक सहकारी आणि समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांचा मोठा आप्तपरिवार आहे.

आसिफभाईंना टीम हॅलो बुलढाणा कडून भावपूर्ण श्रद्धांजली

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!