चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) शहरातील बैलजोडी परिसरात आज दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास मन हेलावून टाकणारी घटना घडली. मीना राजू महाजन (वय 40) या महिलेने स्वतःच्या राहत्या घरात छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरात कुणी नसल्याचा फायदा घेत खुर्चीवर चढून साडी गळ्यात अडकवत तिने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय, चिखली येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.











