spot_img
spot_img

खून प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) प्रकरणाची हकीकत अशी कि, फिर्यादीची काकू “राधाबाई नारायण हिवाळे” मौजे. केळवद येथे राहत असताना दिनांक १४/१०/२०२१ रोजी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी राधाबाईला फोन द्वारे संपर्क केला असता त्यांचा मोबाईल फोन बंद येत असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यानंतर सर्व नातेवाईक यांनी राधाबाई यांचा कसून शोध घेऊन देखील त्या मिळून आल्या नाहीत म्हणून पोलीस स्टेशन, चिखली येथे “मिसिंग तक्रार” देण्यात आली होती.

दिनांक १६/१०/२०२१ रोजी केळवद येथील पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन, चिखली यांना कळवले कि, “राधाबाई नारायण हिवाळे” यांचा मृतदेह केळवद येथील निवृत्ती पांढरे यांच्या शेताजवळील नाल्यामध्ये मिळून आला आहे. तपासाअंती प्रकाश शेनफड हिवाळे यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन, चिखली येथे गुन्हा क्रमांक ६४१/२०२१ नोंद करून भारतीय दंड संहिता १८६०, कलम ३०२, ३९४ व २०१ नोंदविण्यात आले होते.

प्रकरण तपासात घेऊन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, बुलढाणा यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे अनेक साक्षीदार तपासण्यात आले. साक्ष पुराव्याच्या अंती सरकार पक्ष व आरोपीच्या वतीने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद करण्यात आला.

प्रकरणामध्ये आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केलेले मुहे व प्रखर युक्तिवाद विचारात घेऊन विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश श्री. आर. एन. रोकडे बुलढाणा यांनी आरोपी प्रकाश शेनफड हिवाळे यांना निर्दोष मुक्त केल्याचा निकाल पारित केला आहे. आरोपींच्या वतीने अॅड. अजय दिनोदे, अॅड. अबुजर अंसारी, अॅड. प्रियेश चौधरी, अॅड. रोहित दिनोदे, अॅड. गजानन पैठणे, अॅड. किशोर सुरुशे, अॅड. नितीन जाधव, अॅड. जुहेर शेख, अॅड. दर्शन बर्डे, चंद्रशेखर मेश्राम, याहया अली खान यांनी कामकाज पहिले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!