spot_img
spot_img

💥BREAKING बनावट नोटांचे रॅकेट फोडले! बुलढाण्यातील युवक धुळे पोलिसांच्या तावडीत;५०० व १०० च्या नकली नोटा जप्त! बुलढाण्यातून बनावट पैसा राज्यभर पसरतोय का?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) धुळे-सोलापूर महामार्गावर चांदे फाटा येथे धुळे पोलिसांनी धडक कारवाई करत बनावट चलनी नोटांची तस्करी करणाऱ्या बुलढाणा येथील तरुणाला जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून, बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा माग काढण्यास पोलिसांना सुरुवात झाली आहे.

धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना गुप्त माहिती मिळताच, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. चांदे फाटा परिसरातील सूर्यपुत्र हॉटेलजवळ सापळा रचून संशयित तरुणाला थेट जेरबंद करण्यात आले.

अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद जफर मोहम्मद कुद्दुस (रा. टिपू सुलतान चौक, इकबाल नगर, बुलढाणा) असे असून, त्याच्या अंगझडतीतून ५०० रुपयांच्या ४४ आणि १०० रुपयांच्या २ बनावट नोटा, असा एकूण २२,२०० रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी इशारा दिला आहे की, बनावट नोटा तयार करणारे आणि त्यांची तस्करी करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. तर निरीक्षक पाटील यांनी सांगितले की, या कारवाईमुळे बुलढाणा-सह संपूर्ण राज्यात पसरलेल्या बनावट चलनाच्या जाळ्याचा धागा हाती लागण्याची शक्यता आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!