spot_img
spot_img

💥Accident भरधाव मोटारसायकल दुभाजकावर आदळली; दोन तरुण जागीच ठार!

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) साखरखेर्डा बीबी रोडवरील दुसरबीड उड्डाणपूल जवळ आज 9 च्या सुमारास भीषण अपघात घडला! सातबारा हॉटेलसमोर भरधाव वेगात आलेली दुचाकी दुभाजकावर जोरात आदळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आरिफ तंबोली (वय 35) आणि अल्ताफ तंबोली (वय 28, दोघेही रा. साखरखेर्डा) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे बीबी येथे एका रिसेप्शनला गेले होते. कार्यक्रम संपवून रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास ते साखरखेर्डाकडे परतत असताना त्यांची दुचाकी (क्रमांक MH-28 BJ-4029) थेट दुभाजकावर आदळली. या भीषण धडकेत दोघेही जागीच ठार झाले.

अपघात इतका जबर होता की दुचाकीचे तीन तुकडे झाले, तर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळविले असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!