spot_img
spot_img

💥BREAKING जिल्हा हादरला! अंढेऱ्यात चौथा खून – युवकाची निर्घृण हत्या, पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हा!

अंढेरा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात खुनांच्या मालिकेने थैमान घातले आहे! दिवसभरात चौथा खून घडल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथे आकाश उत्तम चव्हाण (वय २५, रा. आसोला बु) या युवकाची निर्दयपणे हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे हा खून अंढेरा पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे!

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी म्हणून अयान सय्यद नासीर (वय अंदाजे १८ ते २०) याचे नाव पुढे आले आहे. अंढेरा बाजार गल्ली परिसरात उघड्यावरच ही हत्या करण्यात आली. तीक्ष्ण शस्त्राने केलेल्या हल्ल्यात आकाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर संपूर्ण गावात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले आहे.

खुनाची वार्ता मिळताच मेहकरचे उपविभागीय अधिकारी खर्डे आणि अंढेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराला वेढा घालून तपास सुरू केला आहे. मात्र, सलग चार खुनांनी जिल्हा हादरला असून नागरिकांमध्ये प्रचंड भीती आणि संताप उसळला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!