spot_img
spot_img

💥BREAKING डोंगरखंडाळा गावावर शोककळा – ‘हॅलो बुलढाणा’ने उघड केली होती दुर्घटनेची खरी कहाणी! असुरक्षित रस्ते, बेकायदेशीर धंदा – किती वेळेपर्यंत असह्य?

चिखली (हॅलो बुलढाणा) रेती माफियांच्या बेकायदेशीर धंद्याने आणखी एका निरपराध नागरिकाचा बळी घेतला! चिखली-अमडापूर मार्गावर घडलेल्या या भीषण अपघाताने डोंगरखंडाळा गावावर शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वीच ‘हॅलो बुलढाणा’ने ही बातमी सर्वप्रथम प्रसारित करून रेती माफियांच्या मनमानीवर बोट ठेवले होते.

दि. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी विजय ओंकार गिरी (वय ४५, रा. डोंगरखंडाळा), बुलढाणा अर्बन बँकेत कार्यरत कर्मचारी,हे (एमएच २९-एए ६०९४) क्रमांकाच्या दुचाकीने हिवरा आश्रमकडे जात असताना महादेव मंदिराजवळ रेतीने भरलेल्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली व जवळपास 50 ते 60 फूट फरफटत नेले अपघात इतका भीषण होता की विजय गिरींचा मृतदेह अतिशय चंदामेंदा झाला होता. धडक दिल्यानंतर टिप्पर चालक वाहनासह फरार झाला.अमडापुर पोलिसांना त्या अपघाताची माहिती मिळाल्या बरोबर त्यांनी त्या टिप्परचा पाठलाग ही केला असल्याची माहिती मिळाली परंतु तो टिप्पर कुणाचा हे आजही अधोरेखित आहे.

या घटनेनंतर नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. रेती माफियांचा हा बळी आहे! अशी जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून टिप्पर चालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

विजय गिरी यांच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात त्यांच्या घरात मात्र शोककळा दाटली आहे.नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, रेती माफियांचा बंदोबस्त करा, नाहीतर आणखी किती निर्दोषांचे जीव जाणार? ‘हॅलो बुलढाणा’ जनतेचा आवाज ठरला असून, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी सातत्याने करत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!