मोताळा (हॅलो बुलढाणा) अलीकडे महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, तालुक्यातील एका गावात 24 वर्षे विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात एका इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेने तक्रारीनुसार ती संध्याकाळी एका किराणा दुकानात खरेदीसाठी गेल्या असता गावातील श्रावण नीना पानपाटील हा इसम तेथे आला आणि ‘तू मला खूप आवडतेस’ असे म्हणत महिलेचा विनयभंग केला. यावेळी महिलेने आरडाओरडा केला असता तिथे एक नागरिक मदतीला धावला परंतू आरोपीने तेथून पळ काढला. याप्रकरणी श्रावण नीना पानपाटील याचे विरुद्ध बोराखेडी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे.















Total Users : 3298217