बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सहकाराच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याचा मान, प्रतिष्ठा आणि कीर्ती सातत्याने वाढवत जिल्ह्याला नव्या उंचीवर नेणारे बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, समाजसेवेचे अध्वर्यू मा. राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांनी सोमवारी ‘हॅलो बुलढाणा’ या जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या मुख्यालयाला भेट देऊन कार्याचा आढावा घेतला.
या वेळी ‘हॅलो बुलढाणा’ चे मुख्य संपादक जितेंद्र देवचंद कायस्थ यांनी भाईजींचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले. भेटीदरम्यान भाईजींनी सिटी न्यूज दैनिक जनसंचलन आणि हॅलो बुलढाणा टीमच्या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीचे कौतुक करत त्यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
भाईजी म्हणाले, “जितेंद्र कायस्थ आणि त्यांची टीम केवळ बातम्या देत नाही, तर बुलढाण्याचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवत आहे. हॅलो बुलढाणा ने अल्पावधीतच जी लोकाभिमुख पत्रकारिता घडवली, ती बुलढाण्याच्या इतिहासात क्रांतिकारक ठरली आहे.”
भाईजींनी पुढे बोलताना जितेंद्र कायस्थ यांना “आपला मानसपुत्र” असे संबोधत त्यांच्यावर स्नेहाचा वर्षाव केला. “ही टीम पुढे नक्कीच महाराष्ट्रातील क्रमांक एकची डिजिटल न्यूज फोर्स बनेल,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कायस्थ आणि त्यांच्या संपूर्ण टीमला दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छाही दिल्या.यावेळी संचालक राजेंद्र कायस्थ, शुभम कायस्थ, यश कायस्थ, ओम कायस्थ, करन कायस्थ, टीम हॅलो बुलडाणा व संपुर्ण सिटी परिवार उपस्थित होते
या भेटीमुळे संपूर्ण हॅलो बुलढाणा परिवारात नवचैतन्य संचारले असून, बुलढाण्याच्या सहकार आणि पत्रकारिता क्षेत्रातील दोन अग्रगण्य प्रवाहांचा हा स्नेहसंवाद प्रेरणादायी ठरला आहे.