अंढेरा (हॅलो बुलढाणा) रेतीमाफिया शासनाचा करोडो रुपयांचा कर बुडवून अवैध रेती वाहतूक व विक्री करीत आहेत. आज 4 ऑक्टोंबर रोजी अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत अंचरवाडी शिवारात 2 आरोपींवर कारवाई करत 20 हजार किमतीच्या 2 ब्रास रेतीसह एक ट्रक असा एकुण 15,20,000 रुपयांचा मुद्देमाल एलसीबीच्या पथकाने जप्त केला आहे.
शहरासह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात अवैध रेती वाहतूक साठवणूक व विक्री केली जात आहे.एलसीबीचे
एक पथक अंढेरा पोलीस ठाणे हद्दीत गस्तीवर असताना, त्यांना अंचरवाडी शिवारात दुपारी गुप्त माहितीवरून पिवळ्या रंगाचे अशोक लेलँड उभ्या स्थितीत दिसले, त्यांनी या ट्रकची झाडाझडती घेतली तेव्हा ट्रक मध्ये अंदाजे 20 हजाराची 2 ब्रास वाळू आढळून आली.या प्रकरणी दोन आरोपीवर अपराध क्रमांक 283/2025 कलम 303(2) 3(5) BNS सहकलम 21(1)21(2) गौण खनिज अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पीएसआय प्रताप बाजड, एचसी दिगंबर कपाटे पिसी,निलेश राजपूत,चालक समाधान टेकाळे यांनी केली.










