spot_img
spot_img

ते नंदीबैल घेऊन आले..शिक्षिकेने पूजा केली..मग भामट्यांनी सम्मोहित करीत सोन्याच्या कुन्हीरी लुटून गेले!

लोणार (हॅलो बुलडाणा) धार्मिकतेच्या आड लपलेल्या गुन्हेगारांनी आता नवा डाव रचला आहे! लोणार शहरातील पटेल नगर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत तीन अज्ञात इसमांनी ‘नंदीबैल आला, नंदीबैल आला’ असा ओरड करत एका शिक्षिकेच्या घरात प्रवेश करून तिची फसवणूक केली आहे.

सौ. आशा प्रविण नागरे (वय 35), व्यवसाय शिक्षिका, राहणार पटेल नगर, लोणार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 2 ऑक्टोबर रोजी दुपारी अंदाजे 1 वाजता ही घटना घडली. तीन इसम नंदीबैल घेऊन गल्लीमध्ये आले. शिक्षिकेने भक्तीभावाने नंदीबैलाची पूजा केल्यानंतर त्यापैकी एक इसम घरात शिरला आणि ‘भविष्य सांगतो’ असे म्हणत तिच्या चेहऱ्यावर काहीतरी औषधाची फुंकर मारली. क्षणातच ती गुंग झाली आणि सम्मोहनाच्या अवस्थेत आरोपीने तिला “दान द्या” असे सांगत कानातील सोन्याच्या कुन्हिरी काढून घेतल्या. कुन्हिरीचे वजन अंदाजे 3.5 ग्रॅम असून किंमत सुमारे 30 हजार रुपये आहे. आरोपी तीनही इसम त्यानंतर पसार झाले. सकाळी भानावर आल्यावर शिक्षिकेला घटनेची जाणीव झाली आणि ती तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी एन.सी.आर.बी. अंतर्गत कलम 318(4), 303(2), 333, 3(5) भा.न्या.सं. 2023 अन्वये गुन्हा दाखल करून तपास पो.हे.का. 1324 यांच्या स्वाधीन केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!