spot_img
spot_img

💥EXCLUSIVE वृंदावन कॉलनीत शिक्षकाचे अपहरण व मारहाण – सासरच्यांविरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा)  वृंदावन कॉलनी परिसरात शिक्षकाचे घरातून अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरद डिगांबर चेके (वय 36, रा. वृंदावन नगर, माळविहीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलडाणा शहर पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे.

फिर्यादी शरद चेके हे शरद पवार विद्यालय, सारोळा मारोती येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा घटस्फोट झालेल्या पत्नी पल्लवीच्या नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचे आरोप आहेत. दि. 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी अनिल दत्तात्रय आकाळ, कैलास ज्ञानबा आकाळ, विलास ज्ञानबा आकाळ, भगवान वसंता आकाळ, त्रिवेणी कैलास आकाळ, जागृती विलास आकाळ आणि मंदाबाई भगवान आकाळ (सर्व रा. भोरसा भोरसी, ता. चिखली) यांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना बाहेर बोलावले आणि जबरदस्तीने क्रुझर (MH 28 AN 3485) गाडीत टाकून भोरसा येथे नेले.तेथे आरोपींनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून धमक्या दिल्या की “परत नांदायला आलास, तर जिवाने संपवू.” त्यानंतर अमडापूर पोलिसांनी फिर्यादीला ताब्यात घेतले आणि खोट्या प्रकरणात अडकवले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या गंभीर प्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात कलम 140(3), 189(2), 190, 191, 351(2), 351(3), 115(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास API जयसिंग राजपूत करत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!