spot_img
spot_img

धाड बसस्थानक घोटाळा उघड! २.५० कोटींचा निधी गडप – अधिकारी व कंत्राटदारांवर गंभीर आरोप!

धाड (हॅलो बुलडाणा) बसस्थानक पुनर्बांधणी कामात प्रचंड भ्रष्टाचाराचा महाघोटाळा उघड झाला असून तब्बल २.५० कोटी रुपयांचा निधी गडप झाल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आरंभ केलेले काम आता ठप्प पडले असून, नागरिक व प्रवासी यांची सरळ फसवणूक झाल्याने संतापाचा उद्रेक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करार क्र. बी-१/बिल्ड/६४, दिनांक १६.०३.२०२४ नुसार कंत्राटदार यश अनिल मंडोवारा यांना पुनर्बांधणीचे काम देण्यात आले होते. कार्यादेशाप्रमाणे हे काम १५.०२.२०२५ पर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. मात्र आजतागायत फक्त ६५% काम झाले असून उर्वरित काम पूर्णतः ठप्प आहे. याशिवाय, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे गंभीर आरोप आहेत.

या घोटाळ्यात महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली १९७१ व कंत्राट नियम २०१३ चे उल्लंघन झाले आहे. तसेच भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४०९ नुसार सरकारी निधीचा अपहार झाला असल्याचे स्पष्ट होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचीही शक्यता आहे. कायदा करार १८७२ नुसार नुकसानभरपाई व दंडाची तरतूद असूनही अधिकारी कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे.

नागरिकांची ठाम मागणी आहे की, दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा व्हावी. भ्रष्टाचारात सामील कंत्राटदाराला कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे. करारभंगाबद्दल दंड आकारून जनतेचे नुकसान भरून काढावे. तसेच CAG/AGI स्तरावर ऑडिट करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!