spot_img
spot_img

💥BREAKING! ‘या’ भस्मासुराने एक लाखाची लाच घेतली!

शेगाव (हॅलो बुलढाणा) अलीकडे ‘लक्ष्मी भेट’ स्वीकारण्याची सवय अंगवळणी पडल्याने सरकारी बाबुंची खाबुगिरी वाढत चालली आहे.आज ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना बुलढाणा लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. सतीश सुभाष कराड रा. बाळापूर, जि. अकोला.असे लाचखोराचे नाव आहे.हा प्रकार शेगाव येथील श्री कृपा पेट्रोल पंपा समोर घडला.

गलेलठ्ठ पगार घेऊनही दिवसागणिक लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे.आज ग्राम महसूल अधिकारी सतीश सुभाष कराड याने शेतीचा गट क्रमांक दुरुस्त करण्यासाठी तक्रारदार यांना तब्बल एक लाख 25 हजार रुपयांची लाच मागितली होती.तडजोडीअंती एक लाख रुपये घेण्याचे तलाठी याने मान्य केले होते.दरम्यान बुलढाणा लाचलुचपत विभागाने सापळा रचून या लाचखोराला सापळा रचून एक लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई अमरावती अँटी करप्शनचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप,अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, अकोलाचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बाहकर,बुलढाणा चे पोलीस अधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनात पथकाने केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!