spot_img
spot_img

‘त्या’ ‘रजनीकांत’ च्या बाजूला ‘ती’ ‘श्रीदेवी’ सापडली!

देऊळगाव मही (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) बातमीचे शीर्षक वाचून चकित होऊ नका! देऊळगाव मही येथील हॉटेल रजनीकांत च्या बाजूला जुगार चालू होता. काल 28 सप्टेंबरला पोलिसांनी धाड टाकून श्रीदेवी नावाची वरली मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठी सह एकूण तीन हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली आहे.शेख इरफान शेख गुलाब नबी (वय 33) रा.देऊळगाव, ता. देऊळगाव राजा असे आरोपीचे नाव आहे.

जगात जुगार फार जुना आहे, अगदी महाभारतातही त्याचा उल्लेख आहे, जिथे युधिष्ठिर सर्वस्व गमावतो. ऋग्वेदातही जुगाराच्या व्यसनाचे वर्णन आहे. कालांतराने जुगाराचे स्वरूप बदलले असले तरी त्याची ओढ आणि व्यसन अजूनही तीव्र आहे. वैदिक काळापासून ते आजच्या ऑनलाइन युगापर्यंत, जुगारामुळे सर्वस्व गमावण्याच्या घटना सारख्याच आहेत.हा खेळ नसून, व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर खोलवर परिणाम करणारा हानिकारक व्यवहार आहे. आज जुगाराचे व्यसन ही गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. आर्थिक अस्थिरता, रोजगाराची चिंता आणि सहज उपलब्ध असलेल्या डिजिटल माध्यमांमुळे झटपट पैसे कमवण्याच्या आशेने लोक जुगाराकडे वळतात. तरुण, तसेच कमी उत्पन्न असलेले आणि मानसिक तणावात असलेले लोक याला सहज बळी पडतात. ग्रामीण भागात जुगार खेळ जोमात सुरू असून पोलीस प्रशासन कोमात दिसत आहे.अधून मधून कारवाई केली जाते. दरम्यान देऊळगाव मही येथील हॉटेल रजनीकांत च्या बाजूला जुगार चालू होता. पोलिसांनी धाड टाकून श्रीदेवी नावाची वरली मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठी सह एकूण तीन हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय. एएसआय ओम प्रकाश साळवे यांनी फिर्याद दिल्याने आरोपीविरुद्ध अपराध नंबर 405/कलम 12 (अ) मजुका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान जिल्ह्यात अवैध जुगाराची व्याप्ती व धोका वाढला असून पोलिसांचा कुणालाही धाक उरल्याचे दिसून येत नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!