spot_img
spot_img

💥ब्रेकिंग! भांबळे नामक भामट्याने केली 1 कोटी 10 लाखांची फसवणूक !

शेगाव (हॅलो बुलढाणा) शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक केल्यास चांगल्याप्रकारे परतावा अल्पावधीत मिळेल असे अमिष दाखवून संत नगरी शेगावातील एका भांबळे नामक भामट्याने काही लोकांचा विश्वास संपादन करुन बनावट फॉर्म द्वारे घोटाळा करीत तब्बल 1 कोटी 10 लाखांची आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

अलीकडे शॉर्टकट पैसे कमावण्याचा मार्ग अनेक जण अवलंबित असल्याचे दिसून येते.शेगाव येथील भांबळे नामक इसमाने शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली वर्षाला दाम दुप्पट करण्याचे आश्वासन देत, काही लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांना एका व्हाॅटसअप ग्रुपमध्ये सहभागी केले. त्यानंतर सुरुवातीला गुंतवणुक केल्यावर लोकांना थाेडाफार परतावा देण्यात आला. माेठ्या स्वरुपात गुंतवणुक केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगत आराेपीने 1 कोटी 10 लाखांची आर्थिक फसवणूक केली. आरोपी
विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर,आर्थिक गुन्हे शाखेचे पीआय सदगिरे व पथकाने केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!