spot_img
spot_img

बुलढाणा शहरात दुपारी दिवसाढवळ्या ५ लाखांचा डल्ला! सीसीटीव्हीमध्ये दोन चोर कैद

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात दिवसाढवळ्या मोठा चोरीचा प्रकार उघड झाला आहे. राजर्षी शाहू कॉलेजच्या समोर उभी असलेल्या कारची काच फोडून तब्बल ५ लाख रुपये कॅश आणि महत्त्वाची कागदपत्रे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन जिजेबा पहाड (रा. बाळखेड, ता. रिसोड) यांनी मुलीच्या प्रवेश फीकरिता मेहकर येथील बँकेतून ५ लाख रुपये काढले होते. त्यांनी ही रक्कम लालसर रंगाच्या पिशवीत ठेवून स्विफ्ट डिझायर (MH-37-AD-7492) गाडीत ठेवली. सायंकाळी ५.३० वाजता ते राजर्षी शाहू कॉलेज येथे पोहोचले आणि प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी आत गेले. याच दरम्यान दोन अज्ञात इसम मोटरसायकलवर येऊन गाडीची काच फोडून ५ लाखांची पिशवी व मुलीची पर्स घेऊन पसार झाले.

घटनेनंतर कॉलेजच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता आरोपी स्पष्टपणे दिसले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पर्समध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व फोटो अशी महत्त्वाची कागदपत्रे होती. शहराच्या मध्यवर्ती भागात अशी निर्भय चोरी घडल्याने नागरिकांत तीव्र संताप व अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोलीस ठाण्याचे सपोनी चापाईतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!