चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) शहरातील राऊतवाडी परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने फोडून अज्ञात चोरट्यांनी
10 लाखांची रोकड लंपास केली. ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, दुपारी (२१ सप्टेंबर) तीन वाजताच्या सुमारास स्थानिकांना कळाल्यानंतर प्रकरण समोर आले. प्राथमिक माहितीनुसार या एटीएममध्ये तब्बल दहा ते अकरा लाख रुपयांची रोकड होती. मात्र नेमकी किती रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.अद्याप संबंधित प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून, डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांकडून तपास सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीसांची पुढील कारवाई सुरु आहे.










