9.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

जालिंदर बुधवतांनी काय दावा केलाय? – म्हणाले.. विधानसभेचा ‘मॅच विनर’ मीच राहील! – ‘हॅलो बुलडाणा’शी साधला मनमोकळा संवाद!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) T20 वर्ल्डकपमधील भारताच्या दमदार विजयानंतर क्रिकेटप्रेमींकडून भारतीय संघाचं कौतुक करण्यात येतंय. मात्र यानंतर राजकीय वर्तुळात वेगळंच राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी ‘विधानसभेची तिकीट मलाच मिळणार!आणि मीच जिंकणार!!’ असा प्रगाढ दावा ठोकला आहे.

बुधवतांनी आज सिटी न्यूज कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला. यावेळी दैनिक जनसंचलन, सिटी न्यूज वृत्तवाहिनी व अल्पावधीतच नावारूपास आलेल्या ‘हॅलो बुलढाणा’पोर्टलची माहिती जाणून घेतली. गोडव्यात झालेल्या या मनोमिलनात त्यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली. नव्हे तर मलाच शिवसेनेची तिकीट मिळणार असून, शंभर टक्के निवडणुकीत जिंकणार असल्याचा बुधवत यांनी आत्मविश्वासानी दावा केला.

लोकसभेत प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा पराभव झाला. त्यामुळे अनेक शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जालिंदर बुधवत यांच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवून तक्रारीचा पाऊस पाडला. शिवाय त्यांनी केलेल्या घोटाळ्यांचीही चर्चा सोशल माध्यमातून सुरू आहे. त्यांची ठेकेदारी सर्वांना ज्ञात आहे.असे असतानाही त्यांनी विधानसभेचे मैदान गाजविणार असल्याचा दावा केला आहे.

▪️ लोकसभेवर दृष्टीक्षेप..
शिवसेना उबाठा महाविकास आघाडीचे प्रा.नरेंद्र खेडेकर लोकसभा थोडक्यात हरले. २०१४ व २०१९ ला ना.प्रतापराव जाधव सव्वा लाखावर मताधिक्क्यांनी जिंकले होते.आता ना.जाधव काठावर पास झाले.पण प्रा.नरेंद्र खेडेकरांसाठी हा पराभव एवढ्यामोठ्या निवडणुकीत पहिला अन् कदाचित शेवटचा ठरणारा वाटत आहे.अपक्ष रविकांत तुपकर पडले, पण तुपकर अडीच लाखापर्यंत पोहोचले. एकट्या सिं.राजा विधानसभा मतदार संघात त्यांना ७४, ७५३ इतकी प्रचंड मते मिळाली, की जेवढी लोकसभेत डॉ.शिंगणेंना ही मिळाली नव्हती. विशेष म्हणजे घाटावरुन लिड घेवून ते घाटाखाली गेले, याचा अर्थ प्रा.खेडेकरांना फटका बसला.असे असताना आता विधानसभेत मीच तिकीट घेणार आणि जिंकून येणार असा दावा बुधवत यांनी सिटी न्यूज दैनिक जनसंचलन सह नुकताच (लॉन्च) झालेला नावारूपास आलेला “हॅलो बुलडाणा” यांना केला आहे.यावेळी उ.बा.ठा. शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना तालुकाप्रमुख लखन गाडेकर, सिटी न्यूज,दैनिक जनसंचलन व ‘हॅलो बुलडाणा’ चे मुख्य संपादक जितेंद्र कायस्थ, दैनिक जनसंचलनचे उपसंपादक अजय राजगुरे, सिटी न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी सुनील मोरे, कायस्थ कॅटर्सचे संचालक सोमूभाऊ कायस्थ, उपस्थित होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!