शेगाव (हॅलो बुलडाणा) देवाजवळ सुख दुःखातून सोडवणूक करावी, असे साकडे घातले जाते. मात्र आज राज्यमंत्रीबाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार यांना मुख्यमंत्री होऊ द्यावे,असे श्री संत गजानन महाराजांना साकडे घातले आहे.
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी शेगाव येथे श्री संत गजानन महाराज यांच्या मंदिरात समाधीचे दर्शन घेतले.दरम्यान अजित पवार हे नव्या काळामध्ये मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे त्यांनी संत गजानना चरणी घातले आहे. आगामी निवडणुका महायुती मधूनच लढवणार, मात्र काही ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, सरकार मधील 8 मंत्र्यांना डच्चू मिळणार असा दावा सामना वृत्तपत्रातून करण्यात आला, त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील, त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही,असेही ना. पाटील म्हणाले.शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अवैध सावकारांवर कठोर कारवाई करणारअसल्याचीही त्यांनी यावेळी सांगितले.