spot_img
spot_img

‘एक गाव – समृद्ध गाव’ ह्या दिशेने कृषी विभागाचा दृढ निर्धार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा/ सचिन जयस्वाल) गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी विभाग आक्रमक पवित्रा घेत कार्यरत झाला असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा निर्धार केला आहे. नुकत्याच आयोजित मार्गदर्शन शिबिरात रेशीम उत्पादन, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती, जमिनीचे आरोग्य, जलतारा प्रकल्प व बचत गटांच्या माध्यमातून सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात मृद व जलसंधारणाअंतर्गत गावात झालेल्या महत्त्वाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. सिमेंट बंधाऱ्यांचे खोलीकरण, माती बंध, गाळ काढणे, ढाळीचे बांध याबाबत चर्चा झाली असून, भविष्यातील कामांची आखणीदेखील करण्यात आली. शेतीच्या विविध अंगावर आधारित योजनांची माहिती देऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय योजनांबाबत देखील शेतकऱ्यांना जागृत करण्यात आले.

कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून कृषी विभागाचे सोहम बेलोकार साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी एस.डी. हूडेकर तसेच रायपूर येथील सहाय्यक कृषी अधिकारी कविता जाधव मॅडम यांनी उपस्थित राहून महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!