बुलढाणा (हॅलो बुलडाणा) पत्रकारिता ही आपल्या मानवी समुदायाची पायाभूत गरज होती.. आहे..आणि नेहमीच राहील.. त्यामुळेच स्वतंत्र विचारसरणी, निर्भीडपणे नि:पक्षपाती पद्धतीने वाचकापर्यंत ‘हॅलो बुलढाणा’ एक ‘अंगारवाट!’ बनून बातम्या पोहचवण्याची जबाबदारी पार पाडत आहे. कारंजा चौकातील नव्या कार्यालयाचे काम आटोपले असून, सोमवारपासून पुन्हा बातम्यांची गती झपाट्याने वाढणार आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या जनतेने ‘हॅलो बुलढाणा’वर जी विश्वासाची आणि प्रेमाची पावती दिली आहे, ती आमच्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. आपल्या साथीनं आणि विश्वासानं हॅलो बुलढाणा लवकरच 14 लाख वाचकांचा ऐतिहासिक टप्पा पार करत आहे — हे आपलं सामूहिक यश आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कार्यालयाचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे बातम्या वेळेवर आणि प्रमाणात पोहोचवणं थोडं अवघड झालं होतं तरी आम्ही आमच्या वाचकांना बातम्या उपलब्ध करून दिल्या. काही जणांनी यावर बोलचाली केल्या..परंतु त्यांना आमचे सुपरफास्ट यश कदाचित पाहवत नसेल! असो…स्पर्धात्मक युग आहे.. काही ‘नवीन शेंगदाणे’ उडाले. पण आम्ही शांत होतो, कारण आम्हाला खात्री होती..’ हॅलो बुलढाणा’ ही बातमीची ताकद आहे.. नुसती चर्चा नव्हे! दर्जा आमचा श्वास आहे, आणि तो कोणत्याही परिस्थितीत झुकत नाही! आता आमचं कार्यालय पूर्णत्वास आलं आहे, आणि आम्ही परत आलोय.. दुपटीनं आक्रमक, आणि अधिक सजग!
सोमवारपासून ‘हॅलो बुलढाणा’ पुन्हा आपल्या ब्रेकिंग बातम्या, शोध journalism आणि प्रबळ विश्लेषणासह मैदानात सज्ज होतो आहे…आणि आहेच! आपल्या अथांग पाठिंब्याबद्दल धन्यवाद.
आणि हो.. ‘थोडा वेळ लागला, पण ‘कमबॅक’ कायम मोठा असतो!
‘हॅलो बुलढाणा’ तुमचं, आमचं, बुलढाण्याचं!




Total Users : 3595967