बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने ‘मिशन परिवर्तन’ला बाईक रॅलीने जनजागृती करीत प्रारंभ करण्यात आला आहे. रॅलीला साडेबारा वाजताच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली.
गांजा, भांग, गुटख्यासह अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जिल्हा पोलीस दलाने शहरातून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने बुलढाणेकरांचे लक्ष वेधून घेतले. अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी सदरील बाईक रॅली 26 जून रोजी 12:30 वाजता काढण्यात आली. या निमित्ताने तत्पूर्वी सहकार विद्या मंदिरात छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रबोधनात्मक वर्ग घेण्यात आला. शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. यावेळी ‘नशा कत्ल करता है…’, ‘अंमली पदार्थांचे सेवन टाळा’, ‘ड्रग्ज फ्री बुलढाणा’, ‘से नो टू ड्रग्ज’ या आशयाचे सामाजिक संदेश देणारे फलक झळकावत सदरची रॅली शहरातील त्रिशरण चौक, सर्कुलर रोड,धाड नाका असे वळण घेत संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली अशा विविध मार्गाने काढण्यात आली.