spot_img
spot_img

💥EXCLUSIVE सानंदांच्या गोटात भूकंप! खामगावचे आ. आकाश फुंडकरांचा जबर झटका – विश्वासू काँग्रेस कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या राजकीय अस्तित्वाला जबर हादरा बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावरच त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी विश्वास टाकणे बंद केले असून, थेट भाजपमध्ये प्रवेश करून त्यांच्यावर राजकीय आघात केला आहे.

खामगावचे आमदार व सानंदांचे कट्टर राजकीय विरोधक आकाश फुंडकर यांनी हा मास्टरस्ट्रोक खेळत सानंदांच्या काँग्रेसमधील अनेक सहकाऱ्यांना भाजपच्या गोटात आणले. आज अकोला येथे पार पडलेल्या “विकास संवाद सभेत” काँग्रेसच्या माजी जि.प. अध्यक्षा वर्षाताई वनारे यांचे पती आणि माजी बांधकाम सभापती सुरेश वनारे, माजी सभापती सुरेशसिंह तोमर, जलंबच्या सरपंच मंगलाताई घोपे, माजी सरपंच भरतसिंह चव्हाण, तसेच आशिष देशमुख, मधुकरसिंह तोमर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बबलु नरवाडे, नागेश बोराडे, अनिकेतसिंह तोमर आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.या प्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सर्वांचे भगवा दुपट्टा देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे वक्तव्य करून, त्यांनी काँग्रेस आणि सानंदा यांच्यावरील नाराजीचा स्पष्ट संदेश दिला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!