बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मढ फाट्यावर एक बसच्या अपघाताची दुर्दैवी घटना घडली.या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.मृतक हा वालसावंगी येथील रहिवासी असल्याचे समजते ही घटना मढ येथे घडली.मढ येथील फाट्यावर अनेक ट्रॅव्हल्स आणि बस थांबतात.परंतु अशा दुर्दैवी घटना घडत आहेत.महाराष्ट्र परिवहन महामंडळ यांनी नियोजन शून्य कार्यभार स्वीकारला असून, अशा दुर्दैवी घटना घडत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.