बुलढाणा (हॅलो बुलडाणा) केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्यातून बुलढाणा जिल्ह्यात 6 ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट आणि 34 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी सुमारे 23 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरात मिळाली असून या संदर्भातील आदेश बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पाठवण्यात आले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून नव्याने जिल्ह्यात सहा ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट आणि 34 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे या संदर्भातील प्रस्ताव बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने पाठवण्यात आला होता या प्रस्तावाचा पाठपुरावा केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला होता त्यानुसार 15 व्या वित्त आयोगातून बुलढाणा जिल्ह्यात सहा ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट बांधण्यासाठी प्रत्येकी 50 लक्ष रुपयांचा निधी असा एकूण तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हे ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट लोणार सिदखेडराजा देऊळगाव राजा मोताळा संग्रामपूर शेगाव येथे बांधण्यात येणार आहे तर जिल्ह्यातील 34 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी प्रत्येकी 58.275 लाख रुपये असा एकूण 1981 .35 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये खामगाव तालुक्यातील नांद्री , बोरजवळा ,पारखेड ,चिखली तालुक्यातील इसोली ,गांगलगाव ,सवना करवंड , डोंगर शेवली , पळसखेड दौलत जळगाव जामोद तालुक्यातील पळशी सुपो मलकापूर तालुक्यातील देवधाबा हरणखेड म्हैसवाडी दाताळा मेहकर तालुक्यातील दुधा ,मोडा , वरवंड ,चायगाव ,नांदुरा तालुक्यातील आलमपूर संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा मनसगाव बुलढाणा तालुक्यातील सातगाव म्हसला मढ सिदखेडराजा तालुक्यातील पांगरी उगले लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू बुमराळा गुंजखेड वडगाव तेजन येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात इमारत बांधकामासाठी हा निधी मंजुर झाला आहे या संदर्भाचे पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे वतीने बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात आले आहे बांधकामाची कारवाई करून सुरू करावेत असे नमूद केले आहे त्यामुळे आगामी काळात या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये इमारत बांधकाम होणार आहे.