बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध शासकीय कार्यालयासमोर उपोषणकर्ते वारंवार रस्त्याच्या बाजुला किंवा फुटपाथवर मंडप टाकुन उपोषणास बसतात. त्यामुळे रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होतो. असे प्रकार टाळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने उपोषण करण्याची जागा निश्चित केली आहे. त्यानुसार उपोषणकर्त्यांनी येथील जिजामाता प्रेक्षगार समोरील मोकळ्या जागेत उपोषण करावे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी दिली.