spot_img
spot_img

महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात शिवसेना उ.बा.ठा.चा ठिय्या!

मलकापूर (हॅलो बुलडाणा/रविंद्र गव्हाळे) नांदुरा, जळगाव (जामोद) तालुक्यात महावितरणच्या उदासीन कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतातील विद्युत पोल वरील तारा चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या त्यामुळे पीक जगविण्यासाठी शेतकरी मेटाकुटीस आला असून,शिवसेना (उ.बा.ठा) जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वात महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

गत दोन-तिन वर्षापासून निमगाव भागातील 4 शेतकऱ्यांच्या शेतातून विद्यूत तार चोरी जाऊन 2 ते 3 वर्षे झाले परंतू तार टाकण्यात आले नाही. शेतातील विहिरीत पाणी उपलब्ध असतांनाही बागायती शेती करता येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दरम्यान ही समस्या सोडवण्यासाठी मलकापुर कार्यकारी अभियंता आर.जि.तायडे यांच्या कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, तालुका प्रमुख दिपक चांभारे, शहरप्रमुख गजानन ठोसर यांच्या नेतृत्वात शिवसेना स्टाईलने ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जोपर्यंत विद्युत पोलवर तारा ओढल्या जात नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी तटस्थ भूमिका घेतली होती.याप्रसंगी तायडे यांनी संबंधित शेतकऱ्यांचे काम मनोज ब्राह्मणकर या ठेकेदाराला करण्याचे आदेश दिले व संबंधित ठेकेदाराने 15 ते 20 दिवसात हे काम पुर्ण करुन देतो असे आश्वासन शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले आहे.यावेळी उपशहर प्रमुख बाळू पोलाखरे, उपशहर प्रमुख शकील जमादार, उपशहर प्रमुख समद कुरेशी, कामगार सेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, किसान सेना शहर प्रमुख सै.वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, युवा सेना तालुकाप्रमुख पवन गरुड,माजी नगरसेवक पांडुरंग चीम, श्याम जाधव, चाॅद चव्हाण,विश्वनाथ पुरकर,विभाग प्रमुख राजेंद्र काजळे, विभाग प्रमुख गणेश सुशीर ,दीपक कोथळकर, मोहम्मद रफीक अकील गौरी ,सै. तौफिक, एजाज भाई, शेख युसुफ,शेख इरफान, वासुदेव भोळे,दीपक सरोदे अकील चव्हाण, रफिक भाई, मो. रफीक साबीर खान, सत्तार शहा सह मलकापूर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांची उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!