बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मराविवि कंपनीचे अशोका बिल्डकॉन लिमिटेड नाशिक कंपनीचे शेळगाव आळोळ येथील पॉवर हाउस मध्ये ठेवलेले तब्बल 3 लाख 84 हजार रुपये किंमतीचे 32 लोखंडी पोल चोरणाऱ्या 2 आरोपींना अंढेरा पोलिसांनी गजाआड केले आहे.सोहेल शेख यासीन 25, कुणाल गणेश खेडेकर 24 दोघे रा. अंत्री खेडेकर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा असे आरोपींची नावं आहे.
अशोका बिल्डकॉन लिमिटेड नाशिक कंपनीचे शेळगाव आळोळ येथील पॉवर हाउस मध्ये ठेवलेले तब्बल 3 लाख 84 हजार रुपये किंमतीचे 32 लोखंडी पोल 20 फेब्रुवारी ते सहा मार्च दरम्यान चोरी गेल्याची तक्रार बुलढाणा ( धाड नाका ) येथील गजानन मोहनराव धंदर यांनी अंधेरा पोलीस स्टेशनला दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आरोपीस अटक करून गुन्हा उघडकीस आणला.पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 32 लोखंडी पोल जप्त केले आहेत.इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींनी मराविवि कंपनीच्या कामावरील ठेकेदारांनी आणून ठेवलेल्या लोखंडी पोलच्या ठिकाणी रेकी करून पोल वाहनात टाकून लंपास केले होते.दरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सपोनि रुपेश शक्करगे,पोउपनि सुरेश जारवाल, सिद्धार्थ सोनकांबळे,भरत पोफळे, श्रीकांत पव्हरे, राजू आडवे, ऋषिकेश खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा यांनी ही कामगिरी केली.