spot_img
spot_img

💥’खाकीतील संवेदनशिलता!’ ठाणेदार दुर्गेश राजपूतांकडून असाही महिला दिनाचा सन्मान! – विद्यार्थिनी, महिलांसाठी केली बस थांब्यावर आसन व्यवस्था!

रायपूर (हॅलो बुलडाणा /सचिन जयस्वाल) काल 8 मार्च ला जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत असताना, बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथे पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या संकल्पनेतून देखील बस थांब्यावर आसन व्यवस्था उपलब्ध करून महिला दिन साजरा करण्यात आला आहे. ठाणेदार राजपूत यांनी स्वखर्चाने सदर असून व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील बस स्थानकावर महिला दिनाचे औचित्य साधून रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी व महिला यांना रायपूर बस स्थानकावर बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची आसन व्यवस्था नसल्यामुळे रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी त्यांच्या स्वखर्चाने आसन व्यवस्था करून दिली.या छोट्याखानी कार्यक्रमाचे उद्घाटन बुलढाणा डीवायएसपी सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थिनींच्या हस्ते फितकापून उद्घाटन करण्यात आले. रायपूर पोलीस स्टेशनने महिला व विद्यार्थिनी यांना रायपूर बस स्थानकावर आसन व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने खरा महिला दिन साजरा झाल्याचे बोलल्या जात होते. यावेळी बालाप्रसाद जयस्वाल, हिम्मतराव जाधव प्राचार्य किशोर शिरसाट अनुप अहिर तसेच जिजाऊ ज्ञान मंदिरच्या विद्यार्थिनी व शिक्षिका तसेच रायपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!