खामगाव (हॅलो बुलडाणा) गुन्हेगारी दिवसागणिक वाढत आहे. बीड येथील सरपंच हत्या प्रकरणाचा संताप महाराष्ट्रभर व्यक्त होत असतांना आता खामगाव येथील सुटाळा भागातील सरपंच निलेश देशमूख यांच्यावर क्षूल्लक कारणावरून प्राण घातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.खामगाव मध्ये सरपंचावर प्राणघातक हल्ला चढवण्यात आला. हल्ल्यात निलेश देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.ही घटना सुटाळा फाट्यावर घडली. सरपंच देशमूख यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला असून ते थोडक्यात बचावले आहे. हल्ला करणारा एक आरोपी मयूर सिद्धपुरा पोलिसांनी पकडला मात्र इतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
- Hellobuldana