बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विनापरवाना आणि कागदोपत्री पूर्तता नसलेली अवैध वाहने जिल्ह्यात सुसाट धावत असून, परिवहन कार्यालय अशा वाहनांना ‘कायदेशीर’ब्रेक कधी लावेल? असा प्रश्न शिवसेना प्रणित शिव वाहतूक सेना ने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.शिवाय वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र नसल्यास सदर वाहने शासन जमा करण्याची आग्रही मागणी करीत आंदोलनाचा इशारा दिलाय!
बुलढाणा जिल्ह्यातील काळी-पिवळी, वाहतुक ऑटो रिक्शा, स्कुल बसेस व इतर
बरेचशी वाहने विनापरवाना कागदोपत्री पुर्तता नसलेली वाहने सर्रास धावताहेत. अशा ब-याचशा वाहनांचे आजपर्यंत अपघात सुद्धा झालेले आहेत. त्यामध्ये अनेक नागरीकांची जिवीत हानी झाली.. कायम स्वरुपी अपंगत्व
सुद्धा आलेले आहे.अशा वाहनांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न करता सर्रास ही वाहने परत जिल्ह्यातील वाहतुकीसाठी रोडवर सुसाट वेगाने पळताहेत, या सर्व बाबींना जबाबदार जिल्ह्यातील परीवहन कार्यालयातील
अधिकारी तसेच जिल्हा पोलीस वाहतुक कार्यालयातील सर्व वाहतुक कर्मचारी यांचे संगणमत असल्यामुळे हा प्रकार सर्रास सुरु असल्याचा आरोप शिव वाहतूक सेने ने केला आहे. 10 फेब्रुवारी रोजी बुलढाणा मध्ये झालेल्या अपघातामध्ये एका मद्यधुंद चालकाने बेकायदेशीर जलद गतीने वाहन चालवून एका तरुणीला उडवीले असुन तिचा मृत्यु झालेला आहे.या घटनेवरुन असे लक्षात येते की, बुलढाणा आर. टी ओ, अधिकारी-कर्मचारी झोपेत आहे. व शहरातील ट्रॅफीक पोलीस
यंत्रणा फक्त नावापुरत्या शासकीय ड्युट्या करीत आहे. तरी सदर घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे.
या गैरप्रकारावर कुठेतरी त्वरीत आळा बसावा व कार्यवाही व्हावी आणि ज्या वाहनांचे किंवा वाहन चालकांचे परवाने व वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नसेल ती वाहने त्वरीत शासन जमा करुन घेण्यात यावी अशी बुलढाणा जिल्हा शिववाहतुक सेनेची आग्रही मागणी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेष चौकशी बसवुन
तात्काळ कारवाई करावी. येत्या २४ तासाच्या आत कारवाई यावी,अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण सोडण्यात येईल असा इशारा,शिव वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेश मुंगळे यांनी दिला आहे.