बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेगाव तालुक्यातील टक्कल बाधितांवर पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांच्या टीमने केस गळतीचे कारण सिलेनियमचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले अधिकृत कारण अद्यापही अस्पष्ट आहे. दरम्यान ‘हॅलो बुलढाणा’च्या माहितीनुसार संबंधित गावातील साडे 22 किलो धान्य काल मुंबई प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.दरम्यान काल नव्याने 14 रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातर्गत 11 गावांमध्ये 229 हून अधिक केस गळतीचे रुग्ण संख्या झाली आहे. दरम्यान शास्त्रज्ञ या केस बाधितांच्या केसांच्या मुळापर्यंत गेले असून, याच्या नेमक्या कारणाचा अधिकृत खुलासा आरोग्य विभागाकडून झाला नाही. अचानक केस गळतीच्या अजब आजाराचे मुळ शोधण्यासाठी दिल्ली, चेन्नई येथील ICMR शास्त्रज्ञ, होमिओपॅथी आयुष युनानीचे तज्ञ डॉक्टारांना संशोधन कार्यासाठी पाचारण करण्यात आले होते. संशोधनाअखेर
जमिनीत व पाण्यामध्ये सिलेनियमचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे ही केस गळती होत असल्याचे पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.काल नवीन रुग्ण आढळलेल्या गावात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू झाले आहे तर संबंधित गावातील 23 किलो धान्य पुन्हा मुंबईच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.लवकरच या केसगळती प्रकरणाचा निष्कर्ष समोर येईल असे सूत्रांनी सांगितले.