बुलढाणा (हॅलो बुलडाणा) काही वेळापूर्वी माता रमाई जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. परंतु काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.परंतु पोलिसांनी यावर नियंत्रण मिळविले.
माता रमाई जयंती निमित्त कारंजा चौक परिसरात रॅली काढण्यात आली.दरम्यान
गर्दा हॉल जवळ काही युवकांमध्ये मारामारी झाली.यावेळी मोठा वाद निर्माण होत होता परंतु मोठा गोंधळ होण्यापूर्वी बुलढाणा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन गर्दी पांगवली असून सध्या तणाव निवळला आहे.