बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तोमोई मॉन्टेसरी स्कूल व तोमोई इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या वारीचे प्रतीकात्मक रूप शाळेच्या परिसरात साजरे केले.विठ्ठल रूखमाईच्या मूर्तीची पालखी काढून राम कृष्ण हरीचा गजर करत टाळांच्या निनादात पावली खेळली.काही विद्यार्थी विठ्ठल रुखमाईच्या वेशभूषेसह तर काहींनी संत ज्ञानदेव, संत मुक्ताबाई, संत तुकाराम यांच्यासह विविध संतांच्या साकारलेल्या वेशभूषा लक्षवेधी होत्या. शाळेतील शिक्षकांसह पालकांनीही यात उत्साहाने सहभाग घेतला होता.
- Hellobuldana