बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या ‘अजितपर्व, युवा जोडो’ अभियानांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील गर्दे वाचनालयात 7 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य युवक मेळावा उत्साहात पार पडला. शेकडो युवकांच्या सहभागाने हा मेळावा जोशपूर्ण महासंगम ठरला.प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण यांनी युवकांना उद्देशून सांगितले की, युवक हा केवळ मतदार नसून देशाचा भविष्यातील नेता आहे. त्याने राजकारण, समाजसेवा, रोजगार आणि शिक्षण यामध्ये सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. राजकारण ही सत्ता मिळवण्याची संधी नसून समाजसेवेचा सर्वोत्तम मार्ग आहे.
जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी बुलढाण्याच्या विकासासाठी युवकांच्या प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. आमदार मनोज कायंदे यांनी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.या मेळाव्यात इरफान अली शेख, शेखरजी बोंद्रे, राहुल देशमुख, अमर पाटील, मनोज दांडगे, निलेश देठे, मंगेश बिडवे, निर्मल तायडे, गिरीधर ठाकरे, रंगराव बापू देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी युवकांना भविष्यातील संधी, राजकीय सहभाग आणि समाजकार्यातील जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले.
मनीष बोरकर यांनी जिल्ह्यातील युवकांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि सामाजिक विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही नवे उपक्रम राबवू. आमच्या प्रत्येक युवकाला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे असे ते म्हणाले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीराम सुसार, गौरव देशमुख, जगन कांदाजे, अजय गायकवाड, महेंद्र कड, विशाल फडत यांनी विशेष योगदान दिले.