बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘टक्कल का पडते रे भावा?’ हा प्रश्न राज्यभरातील अनेकांना पडला असताना,अखेर पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांच्या टीमने केस गळतीचे कारण शोधून काढले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातर्गत 11 गावांमध्ये 250 हून अधिक केस गळतीचे रुग्ण आढळले होते.दरम्यान शास्त्रज्ञ या केस बाधितांच्या केसांच्या मुळापर्यंत गेले असून, याच्या नेमक्या कारणाचा खुलासा केला आहे.अचानक केस गळतीच्या अजब आजाराचे मुळ शोधण्यासाठी दिल्ली, चेन्नई येथील ICMR शास्त्रज्ञ, होमिओपॅथी आयुष युनानीचे तज्ञ डॉक्टारांना संशोधन कार्यासाठी पाचारण करण्यात आले होते. संशोधनाअखेर
जमिनीत व पाण्यामध्ये सिलेनियमचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे ही केस गळती होत असल्याचे पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांनी सांगितले आहे.