बुलढाणा (हॅलो बुलडाणा) दिव्यांगाशी लगीनगाठ बांधली तर एकाला ‘बुलढाणा अर्बन’ मध्ये नोकरी देण्याचे आश्वासन बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा भाईजी उर्फ राधेश्याम चांडक यांनी दिले आहे. ते सैनिक मंगल कार्यालयात आयोजित दिव्यांग वधु वर परिचय मेळाव्यात बोलत होते.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लॉईड, बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी, समाज कल्याण विभाग जि.प. यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग वधू वर परियच मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष नॅब तथा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक तर उदघाटक म्हणुन जिपचे मुख्यकार्यकारी अधिकारी गुलाबराव
खरात होते. प्रमुख उपस्थितीमध्ये नॅब महाराष्ट्र राज्य नाशिकचे रामेश्वर कलंत्री,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी, मानस फॉऊडेशन प्रा.डि.एस. लहाने आदींची यावेळी उपस्थिती होती.