बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात भव्य युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, हा मेळावा युवक नेतृत्व विकास, राजकीय संधी आणि सामाजिक बांधिलकीवर केंद्रित आहे. हा मेळावा गर्दे वाचनालय, बुलढाणा येथे 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:00 वाजता होणार आहे.
राजकीय मार्गदर्शन आणि युवा जोडो अभियान
या मेळाव्यात युवकांना पक्षाच्या युवा जोडो अभियानांतर्गत सदस्य नोंदणी, राजकीय मार्गदर्शन आणि नेतृत्व विकासाच्या संधी मिळणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीचा प्रचार व प्रसार करून युवकांना पक्षाच्या धोरणांशी जोडण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
या युवक मेळाव्यात महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. सुरजदादा चव्हाण हे उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, आमदार मनोजदादा कायंदे, जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेरजी काझी, तुकाराम अंभोरे, इरफान अली, शंतनु बोंद्रे, शेखरजी बोंद्रे, राहुल देशमुख यांसह पक्षाचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
युवकांसाठी सुवर्णसंधी
मेळाव्यात युवकांना राजकीय संधी, नेतृत्व विकासाचे धडे आणि भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले
अधिक माहितीसाठी संपर्क:
मनिष बोरकर – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, बुलढाणा
86238 41010