मलकापूर (हॅलो बुलडाणा) मलकापूर ते मोताळा रस्त्यावर तालखेळ फाट्याजवळ २२ जानेवारी रोजी रात्री ८.३० च्या सुमारास टाटा सफारी आणि दूचाकीचा भीषण अपघात झाला.या अपघातात दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
मोताळा तालुक्यातील चिंचपूर येथील चंद्रभान चोकाजी तायडे (वय ६०) आणि विनोद रतन सोनत (वय ३५) हे दोघे MH 28 Y 6085 क्रमांकाच्या मोटारसायकलने मलकापूरहून मोताळ्याकडे जात असताना, समोरून येणाऱ्या टाटा सफारी (MH 28 V 5353) ने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात चंद्रभान तायडे यांचा जखमी अवस्थेत उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर विनोद सोनत हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.