spot_img
spot_img

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केस गळती बाधीत गावांना दिल्या भेटी! – संशोधनासाठी आय सी एम आर शास्त्रज्ञांची टीम येणार असल्याची दिली माहिती..

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) केस गळती हा आजार कशामुळे झालाय हे शोधण्यासाठी दिल्ली चेन्नई येथून विशेष तज्ञ डॉक्टरांची टिम बोलवण्यात आली आहे आयुर्वेद युनानी होमिओपॅथी ऍलोपॅथीचे तज्ञ डॉक्टर्स आणि आय सी एम आर चे शास्त्रज्ञ या विचित्र केस गळती आजारावरचे संशोधन करीत आहे नागरीकांनी घाबरून नये असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले

बुलडाणा जिल्ह्यतील शेगाव तालुक्यातील अकरा गावामध्ये नागरीकांचे केस गळती होऊन टक्कल पडत असल्याची समस्या निर्माण झाली आहे आज 11 जानेवारी रोजी केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केस गळती बाधीत गावांना भेटी दिल्या रुग्णांसोबत संवाद सांघला आणि आजाराविषयी जाणून घेतले . हा आजार पहिल्यांदाच उद्भवला असल्याने आजाराच्या मुळाशी जावुन संशोधन करणे गरजे आहे दृष्टिकोनातून केंद्र आणि सरकारच्या आरोग्य विभागातर्फे उपाय योजना सुरु आहे . घरघुती वापरातील तेल साबण शाम्पू या उत्पादनांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे नागरिकांनीही या उत्पादनांची मुदत बाह्य झाली आहे का याचीही तपासणी करून ते वापरण्याचे आवाहन त्यांनी केले
केस गळती होत असलेल्याच्या घटनांची वेळीच दखल घेऊन मी तुम्हाला भेटण्यासाठी आणि धीर देण्यासाठी आलो आहे असुन केंद्र आणि राज्य सरकारचे आरोग्य विभाग 24 तास तुमच्या सेवेत राहणार आहेत असेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामस्थांना सांगितले

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!