देऊळगाव घुबे (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील भरोसा आणि वसंतनगर दरम्यान असलेल्या मुख्य कालव्याचे बांधकाम निकृष्टदर्जाचे झाल्यामुळे भरोसा आणि वसंतनगर येथील शेकडो हेक्टरवरील रब्बीचे पीक चिभडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून जय सेवालाल पाणी वापर संस्थेने उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन सादर केले आहे.
भरोसा व वसंतनगर येथील शेतकऱ्यांच्या शेतामधून मुख्य शाखा कालवा उपसासिचंन योजना टप्पा क्रमांक ३ हा गेलेला आहे या कालव्याच्या सिमेंट कॉग्रेटिकरन अत्यंत निकुष्ठ दर्जाचे करण्यात आलेले असल्यामूळे वसंतनगर येथील शेतकरी कडूबा रामभाऊ चव्हाण यांच्या शेतापासून भरोसा येथील नितीन तेजराव थुट्टे यांच्या शेतापर्यत असलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचे उखळे लागले असल्याने शेतकरी हतबल झाले आहे.
गेली पाच सहा वर्षांपासून पाटाद्वारे भरोसा ,अचंरवाडी,देऊळगावघुबे,रामनगर,मुरादपूर याभागात पाणी सोडण्यात येते प्रत्येक वेळी पाटाला पाणी आले की मुख्यकालव्याला उखळे लागून पाणी शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतात सुरू होते एकदा कालव्यामध्ये पाणी सुटले म्हणजे कालव्याला १० ते १२ दिवस पाणी सुरू असते त्या दरम्यान अति पाण्यामुळे शेतातील पिके पिवळी पडून नुकसान होत आहे काही शेतकऱ्यांच्या शेतात तूरीचे पीक उभे असून सोगंणीला आलेली तूर पिकाला शेतात पाय फसतात म्हणून मजूर सोंगण्याला तयार नाही.दर वर्षी शेतकरी प्रशासनाकडे तक्रारी देतात काहींना मदत दिली जाते तर काहींजण मदतीपासून वंचीत ठेवले जात आहे.या भागात पाटाला पाणी सुटले की काही शेतकरी आनंदी होतात तर काही शेतकरी नाराज होत असल्याचे चित्र आहे सदर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात येण्याची मागणी जय सेवालाल पाणीवापर संस्थेने आपल्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनाकडे केली आहे.